औरंगाबाद मनसे में 'ये सन्नाटा क्यों है भाई`

औरंगाबादचं हे मनसे कार्यालय़ सुनंसुनं आहे. औरंगाबादमध्ये मनसेनं कोणताही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे प्रचार करायचा कोणाचा असा प्रश्न पडल्यामुळे कार्यकर्ते निवांत आहेत.

Updated: Apr 9, 2014, 02:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादचं हे मनसे कार्यालय़ सुनंसुनं आहे. औरंगाबादमध्ये मनसेनं कोणताही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे प्रचार करायचा कोणाचा असा प्रश्न पडल्यामुळे कार्यकर्ते निवांत आहेत.
राज ठाकरेंनी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पाठींबा जाहीर केला असला तरी या मतदारसंघात मनसे कार्यकर्ते चंद्रकांत खैरेंना मदत करण्यास इच्छूक नाहीत.
काही कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी थेट पुणे मुंबई गाठायचा निर्णय घेतलाय. निवडणुकांचा अभ्यास करण्यासाठी तसंच त्या कशा रंगतात हे पाहण्याचा तरूण कार्यकर्त्यांचा मानस आहे.
गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी पुकारलेल्या आंदोलनांमुळे इथले कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले होते. औरंगाबादमध्ये उमेदवार घोषीत करणार म्हणून कार्यकर्त्यात उत्साहही होता. पण आयत्यावेळी मनसेप्रमुखांनी आपला निर्णय बदलला.
सध्या कार्यकर्त्यांना आराम असला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र वेगळं दिसेल असा आशावाद कार्यकर्ते बाळगून आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.