परेश रावल यांचे चित्रपट दाखवू नका- काँग्रेस

चित्रपट अभिनेते आणि अहमदाबाद-पूर्व मधील भाजप उमेदवार परेश रावल यांचे चित्रपट दूरचित्रवाणीवरुन दाखवण्यास मनाई करावी, अशी मागणी गुजरात काँग्रेसच्या कायदा विभागानं केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 25, 2014, 09:08 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
चित्रपट अभिनेते आणि अहमदाबाद-पूर्व मधील भाजप उमेदवार परेश रावल यांचे चित्रपट दूरचित्रवाणीवरुन दाखवण्यास मनाई करावी, अशी मागणी गुजरात काँग्रेसच्या कायदा विभागानं केलीय.
गुजरातच्या निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत काँग्रेसनं पत्र लिहिलंय. परेश रावल हे आता भाजपचे उमेदवार आहेत, त्यांचे चित्रपट दूरचित्रवाणीवरुन दाखवणं म्हणजे त्यांची प्रसिद्धी करण्यासारखं असल्याचा दावा काँग्रेसच्या निकुंज बाबर यांनी केलाय.
यंदा लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रेटी मैदानात आहेत. अभिनेते परेश रावल यांच्या अभिनयाची छाप तर प्रेक्षकांवर पडलेली आहे. आता परेश रावल राजकारणात आपलं भविष्य आजमावणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.