लोकसभा निवडणूक : तुमची `विश लिस्ट`

तुम्हीही यापैंकीच एक असाल तर नव्या सरकारकडून असलेल्या तुमच्या मागण्या-अपेक्षा आमच्यापर्यंत पोहचवा...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 5, 2014, 05:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जगभरातील सर्वात मोठी निवडणूक समजली जाणारी भारताची लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरावर आहे.
तसं पाहता गेल्या कित्येक वर्ष देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेस या पारंपरिक पक्षाला यावेळच्या निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट निश्चितच घ्यावे लागत आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेसचा सर्वात मोठा विरोधी पक्ष गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन मोठ्या जोशात या रणसंग्रामात सामील झालाय.
भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरून अगोदर आंदोलनांच्या माध्यमातून आणि नंतर `आम आदमी पार्टी` नावाच्या एका राजकीय पक्षाच्या माध्यमातून समोर आलेल्या अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत उतरले असले तरी त्यांच्यावर आणि `आप`मध्ये सहभागी झालेल्या हौशी कार्यकर्त्यांवर लोकांचा किती विश्वास आहे, हेही या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येईल.
महाराष्ट्रातही महायुतीच्या माध्यमातून शिवसेना-भाजप-आरपीआयची गट्टी आणि भट्टी चांगलीच जमलीय. सोबतच, राज ठाकरेंच्या मनसेनंही पंतप्रधान म्हणून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलाय.
ही निवडणूक देशाचं चित्र बदलवून टाकणार, असं अनेक राजकीय तज्ज्ञांचं गणित सांगतंय. देशातील तरुणाईला बदल हवाय... हा बदल ते कसा मिळवणार हेही पाहणं यानिमित्तानं औत्सुक्याचं ठरणार आहे.
यंदाच्या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवमतदारांची मोठी संख्या... हे नव मतदार सूज्ञही आहेत... त्यांच्या काही मागण्याही आहेत आणि अपेक्षाही...
तुम्हीही यापैंकीच एक असाल तर नव्या सरकारकडून असलेल्या तुमच्या मागण्या-अपेक्षा आमच्यापर्यंत पोहचवा...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.