LIVE -निकाल रामटेक

प्रोफाईल मतदारसंघाचं : रामटेक

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रामटेक
संध्याकाळी 7:25 वाजताअपडेट शिवसेनेचे कृपाल तुमाने 1 लाख 75 हजार 791 मतांनी विजयी

संध्याकाळी 5 वाजताअपडेट सोळाव्या फेरीनंतर कृपाल तुमाने 1 लाख 45 हजार 108 मतांनी आघाडीवर
संध्याकाळी 4 वाजताअपडेट
आठव्या फेरीनंतर रामटेकचे कृपाल तुमाने 61 हजार मतांनी आघाडीवर

मतदारसंघ : रामटेक (एससी)
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ५५.४५ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – मुकुल वासनिक (काँग्रेस)
महायुती – कृपाल तुमाने (शिवसेना)
आप – प्रताप गोस्वामी
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
मुकुल वासनिक – काँग्रेस – २,९४,९१३ मतं – ३८.५७%
कृपाल तुमाने – शिवसेना – ३,११,६१४ मतं – ४०.७५%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,०२,९००
पुरुष : ७,८६,५६४
महिला : ७,१६,३३६
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 वर्षांनुवर्षे दिल्ली दरबारी राजकारण केलेले असल्याने वासनिक यांना दिल्लीचेच जास्त आकर्षण. यातूनच बहुधा त्यांना मतदारसंघात फिरण्यास कमी वेळ मिळाला असावा, अशी टीका केली जाते.
 गांधी घराण्याशी असलेल्या जवळिकीमुळे वासनिक यांच्याकडे सामाजिक न्याय या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आली. देशातील दुर्बल घटकांचा नेता म्हणून स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्याची चांगली संधी वासनिक यांना चालून आली होती, पण वासनिक हे दिल्लीतच अडकले.
 खात्यावर किंवा मतदारसंघात वासनिक स्वत:चा असा ठसा उमटवू शकले नाहीत. या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात वासनिक यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आणि पक्षसंघटनेचे काम सोपविण्यात आले.
 निवडणूक जशी जवळ येऊ लागली तसे वासनिक यांचे मतदारसंघातील दौरे वाढले.

जातीपातीची समीकरणं
 तेली समाजाचे प्राबल्य या मतदार संघात आहे. त्या पाठोपाठ दलित, कुणबी, मुस्लिम आणि आदिवासी मतदार रामटेक मध्ये आहेत.
 १५ लाख मतदार असलेल्या रामटेक मध्ये ३.५ लाख तेली, २.५ लाख कुणबी, ३ लाख दलित, १.५ लाख मुस्लिम आणि १ लाख आदिवासी मतदार आहेत

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.