कंडोम कुठे मिळेल? जेव्हा तरुणी सगळ्यांना विचारते...

सध्या भारतामध्ये एड्स या भयंकर आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. एड्स होण्याची कारणं वेगवेगळी असली तर सर्वाधिक कारण म्हणजे असुरक्षित यौन संबंध हेच आहे. एड्सपासून वाचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कंडोमचा वापर...

Updated: Jul 13, 2014, 10:20 AM IST
कंडोम कुठे मिळेल? जेव्हा तरुणी सगळ्यांना विचारते...  title=
सौजन्या: व्हिडिओ डॅडी, यू-ट्यूब

नवी दिल्ली : सध्या भारतामध्ये एड्स या भयंकर आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. एड्स होण्याची कारणं वेगवेगळी असली तर सर्वाधिक कारण म्हणजे असुरक्षित यौन संबंध हेच आहे. एड्सपासून वाचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कंडोमचा वापर...

मात्र आजही अनेक जण मेडिकलमध्ये कंडोम मागण्यासाठी लाजतात. पण जर एखादी मुलगी रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला कंडोम कुठे मिळेल? असं विचारत असेल तर... सध्या हाच व्हिडिओ यू-ट्यूबवर धूम माजवतोय.

असुरक्षित शरिरसंबंधांमुळं होणारे आजार तसंच एड्सबाबत प्रबोधनाच्या दृष्टीनं 'व्हिडिओ डॅडी'नं एक व्हिडिओ बनवलाय. या व्हिडिओमध्ये ही तरुणी प्रत्येकाला कंडोम कुठे मिळेल? हे विचारते आणि त्यानंतर प्रत्येकाची प्रतिक्रिया यात दाखवण्यात आलीय. 

सध्या या व्हिडिओचा समावेश व्हिडियो एक्सपेरीमेंटमध्ये करण्यात आला आहे. तर मग पाहा हा व्हिडिओ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.