गरिबांचा प्रवासही महागणार!

केंद्र सरकारनं डिझेल दरात प्रति लिटर तब्बल पाच रूपयांची वाढ केल्यानं एसटीच्या इंधन खर्चात दररोज ६० लाख रूपयांची वाढ झालीय. त्यामुळे एसटीलाही लवकरच मोठी दरवाढ करावी लागणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 14, 2012, 09:44 AM IST

www.24taas.com, मुंबई
केंद्र सरकारनं डिझेल दरात प्रति लिटर तब्बल पाच रूपयांची वाढ केल्यानं एसटीच्या इंधन खर्चात दररोज ६० लाख रूपयांची वाढ झालीय. त्यामुळे एसटीलाही लवकरच मोठी दरवाढ करावी लागणार आहे.
एसटीच्या तिकीट दरांत वाढ करण्याचा प्रस्तावही तयार आहे. हा दरवाढीचा प्रस्ताव आजच महामंडळामार्फत राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर एसटी प्रवास किमान १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाल्यानं एसटीच्या इंधनावरील खर्चाचा बोजा दरमहा १८ कोटी तर वर्षाला २१६ कोटी रूपयांनी वाढणार आहे. एसटीनं काही महिन्यांपूर्वीच दरवाढ केली होती. त्यानंतर लगेच दरवाढ झाल्यास प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.