अमेरिकेकडून भारताला तेल आयातीत सूट

ईरानकडून भारत तेल आयात करताना काय काय उणीवा भासतात, याचा अभ्यास केलाय अमेरिकेनं... वेगवेगळ्या सुत्रांकडून त्यांनी यासंबंधीचे आकडे मिळवलेत. यामध्ये भारत सरकार तसंच सार्वजनिक क्षेत्राकडून उपलब्ध झालेले आकड्यांचाही समावेश आहे. आणि याच आकड्यांचा अभ्यास करून अमेरिकेनं भारताला वेगवेगळ्या सूट दिल्या आहेत.

Updated: Jun 12, 2012, 01:58 PM IST

 www.24taas.com, वॉशिंग्टन 

ईरानकडून भारत तेल आयात करताना काय काय उणीवा भासतात, याचा अभ्यास केलाय अमेरिकेनं... वेगवेगळ्या सुत्रांकडून त्यांनी यासंबंधीचे आकडे मिळवलेत. यामध्ये भारत सरकार तसंच सार्वजनिक क्षेत्राकडून उपलब्ध झालेले आकड्यांचाही समावेश आहे. आणि याच आकड्यांचा अभ्यास करून अमेरिकेनं भारताला वेगवेगळ्या सूट दिल्या आहेत.

भारतासह इतर सहा देशांनी ईरानकडून तेल खरेदीत कमालीची घट केल्यामुळेच आपण ही सूट त्यांना दिली असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. ‘भारत, मलिशया, कोरिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, तुर्की आणि तैवान या देशांनी इराणकडून तेल आयात करणं कमी केलंय, त्यामुळे मी निश्चिंत झालेय’ असं म्हटलंय अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी. ‘वैश्विक बाजारात भरपूर तेल उपलब्ध असल्यानं या देशांना तेलासाठी ईरानवर अवलंबून राहण्याची गरज नाही’, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतंच म्हटलं होतं.

यावेळी प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितल्यानुसार, यासाठी मिळवलेली माहिती ही कोण्या एका स्त्रोताकडून मिळवली नसून, ऊर्जा विभाग, विदेश विभाग, गुप्तहेर यंत्रणांसहित अमेरिका सरकारच्या वेगवेगळ्या स्त्रोतांचा यासाठी वापर करण्यात आला आणि त्यानंतरच या देशांना तेल आयातीसाठी वेगवेगळ्या सूट जाहीर करण्यात आल्या. सुत्रांच्या माहितीनुसार, भारतानं ईरानकडून आयात केल्या जाणाऱ्या तेलात १५ ते २० ट्क्क्यांची घट केलीय.

.