ऑर्नेस्टोनेंच पत्नीला गिफ्ट, ७४० कोटींचे जहाज

Last Updated: Saturday, March 10, 2012 - 16:41

www.24taas.com, लंडन

 

माजी ब्रिटन सुंदरी क्रिस्टी रोपरला तब्बल ७४० कोटी रुपये किमतीची ‘वावा- टू’ ही महागडी यॉट (जहाज) भेट देण्यात आली आहे. ही भेट दिली आहे, खुद पतीराज ऑर्नेस्टोने यांनी. ऑर्नेस्टोने हे लंडनमधील अब्जाधीश आहेत. त्यांचा ब्रिटनमध्ये श्रीमंतीत ८१ वा क्रमांक लागतो.

 

 

क्रिस्टी लंडनमधल्या सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. क्रिस्टीचे पती ऑर्नेस्टोकडे ६.८ कोटी पाउंडची संपत्ती आहे.  मुमताज पत्नीच्या प्रेमापोटी शहाँजाने  'ताजमहल' बांधला. ही वास्तू भारतात  आहे. मात्र, आधुनिक जगात पत्नीवरील प्रेम करण्याची संकल्पना बदलत आहे. तर उद्योगपती अनिल अंबानींनी पत्नी टीना अंबानींना ४०० कोटी रुपये किमतीची नौका भेट दिली होती. तर मुकेश  अंबानी यांनी पत्नी नीता २५० कोटी रूपयांचे जेट विमान गिफ्ट म्हणून दिले होते.

 

 

ब्रिटनची माजी सुंदरी क्रिस्टी रोपरला दिलेली ही यॉट  दहा हजार पाउंड देऊन भाड्यानेही घेता येऊ शकते.  त्यामुळे जरी कोणाला अशी यॉट खरेदी करता येऊ आली नाही तरी काही हरकत नाही. मात्र, पत्नीच्या प्रेमापोटी ऑर्नेस्टोने यांनी पत्नी क्रिस्टीला नवीन यॉट  भेट देण्यासाठी आपली जुनी यॉट  विकून टाकली. तिची लांबी केवळ १५४  फूट होती.

 

 

७४० कोटींचे जहाजाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर ६ डेक, हेलिकॉप्टर पॅड, स्वीमिंग पूल, बीच क्लब, लक्झरी बेडरूम. किनाऱ्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी चार नौकाही जोडण्यात आल्या आहेत.

 

 

 

 

First Published: Saturday, March 10, 2012 - 16:41
comments powered by Disqus