झरदारी आणि गिलानी, काय होणार सुनावणी?

आजचा दिवस हा पाकिस्तानच्या अस्थिर राजकारणासाठी निर्णायकी बनला आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाबरोबरच पाक संसदेतही सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे.

Updated: Jan 16, 2012, 08:56 AM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

 

आजचा दिवस हा पाकिस्तानच्या अस्थिर राजकारणासाठी निर्णायकी बनला आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाबरोबरच पाक संसदेतही सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे. पाकिस्तानातील मेमोगेट प्रकरण आणि पाकचे अध्यक्ष असिफ अली झरदारींवर असलेल्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

 

सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीवर लष्करही बारकाईने लक्ष ठेवून असल्याने  झरदारी आणि पंतप्रधान युसूफ रझा गिलानी सरकारचे भवितव्य ठरणार आहे. पाकचे लष्कर पुन्हा सत्ता ताब्य़ात घेण्याची भीती व्यक्त करणाऱ्या मेमोगेट प्रकरणी स्वतः झऱदारी हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. त्याचप्रमाणे २००७ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी झरदारीवरील गैरव्यवहाराच्या आरोपांचे सर्व खटले बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा आदेश रद्दबातल ठरवत सुप्रीम कोर्टाच्या १७ सदस्यीय खंडपिठाने त्यांच्यावर खटले चालवण्याचे आदेश दिले होते.

 

या न्यायालयीन घडामोडींबरोबरच संसदेत आज सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान होतय. एकीकडे इम्रान खानने घेतील राजकीय भुमिका आणि संसदेतला कोलाहल यामुळे पाकिस्तानसाठी आजचा दिवस अस्थैर्याचा ठरला आहे.