पाकच्या सोनाराने, मढवला तिरंगा सोन्याने

एका पाकिस्तानी सोनाराने भारताचा तिरंगा सोन्याने सजवला आहे आणि रत्नांनी मढवला आहे. या आपल्या कामाने हा सोनार जगात शांततेचा संदेश देऊ इच्छितो. कलीम शहरयार असं या सोनाराचं नाव आहे.

Updated: Jul 11, 2012, 04:42 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

एका पाकिस्तानी सोनाराने भारताचा तिरंगा सोन्याने सजवला आहे आणि रत्नांनी मढवला आहे. या आपल्या कामाने हा सोनार जगात शांततेचा संदेश देऊ इच्छितो. कलीम शहरयार असं या सोनाराचं नाव आहे.

शहरयार याने नॅशनल प्रेस क्लबमध्ये आपल्या अनोख्या झेंड्यांचं कलेक्शन लोकांसमोर आणलं. “मला याद्वारे माझ्या देशाची चांगली प्रतिमा जगभर निर्माण करायची आहे. यातून जगाला शांततेचा, प्रेमाचा संदेश द्यायचा आहे.” असं शहरयार म्हणाला. शहरयार याने अशा प्रकारे पाकिस्तान, भारत, चीन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब राष्ट्रं, कुवेत, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा इत्यादी देशांचे झेंडे बनवले आहेत. हे सर्व झेंडे सोनं आणि हिरे, रत्नांनी सजवलेले आहेत.

हे झेंडे विक्रीस ठेवण्याचा मानसही शहरयारने बोलून दाखवला. या झेंड्यांच्या विक्रीतून येणारा पैसा हा चॅरिटीसाठी वापरण्याची शहरयार याची इच्छा आहे. या ध्वाजांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून शहरयार रावळपिंडी येथे हॉस्पिटल बांधणार आहे.