`भारतीय लोक सेक्सच्या विचारांनी पछाडलेले असतात!`

भारतात वारंवार घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव बदनाम होत आहे. अनेक परदेशी वेबसाइट्स भारताला बदनाम करू लागल्या आहेत.

जयवंत पाटील | Updated: Mar 3, 2013, 05:29 PM IST

www.24taas.com, बीजिंग
भारतात वारंवार घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव बदनाम होत आहे. अनेक परदेशी वेबसाइट्स भारताला बदनाम करू लागल्या आहेत. भारतीय लोक सेक्सच्या विचारांनी पछाडलेले असल्यामुळे भारतात बलात्कारासारख्या घटना होत असतात, अशा प्रकारच्या प्रतिक्रया काही जणांनी दिल्या आहेत. अशा देशात चिनी अथवा विदेशी महिला सुरक्षित कशा राहातील, असा सवाल एका चिनी वेबसाइटवर उपस्थित केला गेला आहे.
ग्लोबल टाइम्स, शिन्हुआ, सीसीटीव्ही अशा अनेक चीनी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी दिल्लीतील गँगरेपला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली होती. तसंच, दिल्लीत चिनी महिलेवर झालेल्या बलात्काराबदद्लही नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे चिनी पर्यटकांनी भारतात जाऊ नये, अशी सूचनाही वेबसाइट्सवरून दिली आहे.

चीनच्या सरकारी वर्तमानपत्रानेही दिल्लीला बलात्कारांची राजधानी संबोधित केलं आहे. चीनच्या सीसीटीव्ही या सरकारी वृत्तवाहिनीनेच या गोष्टीला प्रसिद्धी दिली. दूतावासानेही परदेशी महिला पर्यटकांना भारतात जाऊ नये, अशा आशयाच्या सूचना दिल्या आहेत.