2 वर्षाची सर्वात लहान मॉ़डेलचे लाखो फॉलोअर्स

ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी वयाची मॉडेल ही किती वर्षाची आहे तुम्हाला माहित आहे ?

Updated: Jan 27, 2016, 09:00 PM IST
2 वर्षाची सर्वात लहान मॉ़डेलचे लाखो फॉलोअर्स title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी वयाची मॉडेल ही किती वर्षाची आहे तुम्हाला माहित आहे ? 2 वर्षाची ही चिमुकली आपल्या इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करत असते. तिचे हे फोटो पाहूण तिला आज जवळपास 3 लाख लोकं फॉलो करतात.   

वॅलेंटिना कॅप्री ही ऑस्ट्रेलियाची सर्वात तरुण मॉडेल वेगवेगळ्या पोजेसमध्ये आपले फोटो शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिचं अकाऊंट हॅक झालं त्यानंतर तिचं नवं अकाऊंट ओपन करण्यात आलं. त्यानंतर लगेचच तिचे २० हजार फॉलोअर्स ही झालेत. 

गेल्या वर्षभरात तिला एवढे कपडे स्पॉन्सर झाले की तिला कपडे घेण्याची गरजंच पडली नाही. तिला अनेक कंपन्यांकडूनही वेगवेगळे ऑफर देण्यात आले. तिला एका पोस्टसाठी ४०० डॉलर म्हणजेच जवळपास २४००० रुपये देण्याची ऑफर मिळाली होती.

या 2 वर्षाच्या चिमुकलीला रोज अनेक ऑफर येतात.