फोर्ब्सच्या 'यशस्वी अंडर ३०' यादीत ४५ भारतीय

फोर्ब्सने ३० वर्षाखालील यशस्वी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये वयाच्या ३० व्या वर्षाच्या आधी ज्यांनी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवलं आहे. या यादी मध्ये ६०० पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. 

Updated: Jan 5, 2016, 07:33 PM IST
फोर्ब्सच्या 'यशस्वी अंडर ३०' यादीत ४५ भारतीय title=

नवी दिल्ली : फोर्ब्सने ३० वर्षाखालील यशस्वी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये वयाच्या ३० व्या वर्षाच्या आधी ज्यांनी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवलं आहे. या यादी मध्ये ६०० पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. 

ओवायओ रुम्स या हॉटेल व्यवसायाचा संस्थापक रितेश अग्रवालचा या यादीत समावेश आहे. देशातील १०० शहरांमध्ये २,२०० हॉटेलची चैन उभारल्यामुळे २२ वर्षीय रितेशचा या यादीत समावेश केला आहे.

मोबाईल अॅप्लीकेशन स्प्रिगचे सहसंस्थापक गगन बियाणी आणि नीरज बेरी यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

अल्फाबेटच्या गुगल एक्स सोबत जोडलेली करिष्मा शाह हिचेही नाव या यादीत समाविष्ट करण्यात आहे.

लेखक आणि हास्य कलाकार कनाडाई लिली हिने युट्यूबवर अनेक चाहते तयार केल्याने तिचेही नाव या यादीत आलं आहे.

सिटी ग्रुपची उपाध्यक्ष नीला दास, विश्लेषक दिव्या नेट्टिमी, विकास पटेल, नील राय, विशाल लुगानी आणि अमित मुखर्जी यांचेही नाव या यादीत समाविष्ट केले आहे.