लोगान विमानतळावर आझम खान यांची कसून चौकशी

बोस्टनमधील लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तर प्रदेशचे मंत्री आजम खान यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीची गंभीरता लक्षात घेता भारतीय दूतावसांनी अमेरीकी विदेशी विभागाला वेठीस धरले आहे.

Updated: Apr 27, 2013, 03:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
बोस्टनमधील लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तर प्रदेशचे मंत्री आजम खान यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीची गंभीरता लक्षात घेता भारतीय दूतावसांनी अमेरीकी विदेशी विभागाला वेठीस धरले आहे.
बोस्टन विमानतळावर आझम खान यांची १० मिनीटे चौकशी करण्यात आली. हावर्ड विश्वविद्यालयात महाकुंभ मेळ्यावर व्याख्यान देण्यासाठी तेथे गेले आहेत. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव ही गेले आहेत. या मुद्दावर आम्ही विदेश विभागाकडे विचारणा केली आहे अशी भारतीय दूतवासांचे प्रवक्ते एम श्रीधरनल यांनी माहिती दिली.

‘मी मुसलमान असल्याकारणाने मला विमानतळावर अपमानास्पद वागणूक मिळाली. मी येथे माझ्या स्वेच्छेने आलेलो नाही. हॉवर्ड युनिर्व्हसिटी आमंत्रण दिल्यामुळे मी येथे आलो आहे. याबाबत निषेध करण्यासाठी मी लवकरात लवकर भारतात परतणार आहे’ अस आझम खान यांनी म्हटले आहे.
मात्र लोगन विमानतळावर मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीनंतर आझम खान यांनी हॉवर्ड युनिव्हर्ससिटीतील कुंभमेळ्यावरील आपले व्याख्यान न देताच ते आणि अखिलेश यादव भारतात परतले.