सात नातवंडांची आजी पुन्हा देतेय चार मुलांना जन्म!

१३ मुलांची आई असलेली एक ६५ वर्षीय महिला पुन्हा एकदा चार मुलांना जन्म देणार आहे... वाचून चक्रावलात ना... पण, हे खरं आहे.

Updated: Apr 13, 2015, 04:01 PM IST
सात नातवंडांची आजी पुन्हा देतेय चार मुलांना जन्म! title=

नवी दिल्ली : १३ मुलांची आई असलेली एक ६५ वर्षीय महिला पुन्हा एकदा चार मुलांना जन्म देणार आहे... वाचून चक्रावलात ना... पण, हे खरं आहे.

बर्लिनच्या रहिवासी असलेल्या एनेग्रेट रौनिग ही महिला १३ मुलांची आई आहे. आपल्या नऊ वर्षांच्या सर्वात छोट्या मुलाला खेळण्यासाठी एक सोबती हवा यासाठी या महिलेनं पुन्हा एकदा आई बनण्याचा निर्णय घेतलाय. 

ही महिला सध्या गर्भवती आहे. मिळालेल्या माहितीनुसरा, या महिलेच्या गर्भात सध्या चार अर्भकं आहेत. जर सगळं काही सुरळीत पार पडलं तर ६५ व्या वर्षी 'क्वाड्ररुप्लेटस'ला (एकाच वेळी गर्भात चार मुलं)  जन्म देणारी ही जगातील पहिली वहिली महिला ठरेल... हा एक अनोखा रेकॉर्डच ठरेल.

उल्लेखनीय म्हणजे, या महिलेला सात नातवंडंही आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रौनिग यांची तब्येत सध्या तरी व्यवस्थित आहे. तसंच त्यांच्या प्रसूतीमध्येही कोणतेही अडथळे नाहीत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.