स्टीव्ह जॉब्स प्रेरणा घेण्यासाठी भारतात आले होते - टिम कुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी भेट घेतली. भारतासोबत अॅपलचे खूप दृढ संबंध आहेत कारण अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज प्रेरणा घेण्यासाठी भारतात गेले होते, असं टिम कुक यांनी पंतप्रधानांना सांगितलं.

Updated: Sep 27, 2015, 10:50 AM IST
स्टीव्ह जॉब्स प्रेरणा घेण्यासाठी भारतात आले होते - टिम कुक   title=

सॅन होजे: पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी भेट घेतली. भारतासोबत अॅपलचे खूप दृढ संबंध आहेत कारण अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज प्रेरणा घेण्यासाठी भारतात गेले होते, असं टिम कुक यांनी पंतप्रधानांना सांगितलं.

आणखी वाचा - संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शनिवारी कुक यांच्यावतीनं सांगितलं, 'भारतासोबत आमचे अद्भुत संबंध आहेत. आमचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स प्रेरणा घेण्यासाठी भारतात गेले होते. मोदींची हॉटेलमध्ये जावून टिम कुक यांनी भेट घेतली.'

या भेटीनंतर कुक म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत माझी भेट खूप छान झाली.'

आणखी वाचा - भारतात गुंतवणुकीला दारे खुली, सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य : नरेंद्र मोदी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.