इस्रायली बॉम्ब हल्ल्यात 44 ठार, 100 जखमी

इस्रायल सैनिकांनी गाझायेथील हमास शहरावर हल्ला केला. ज्यात अनेक महिला आणि मुलांसोबत कमीत कमी 17 फलस्तीनी नागरिकांचाही समावेश आहे. तसेच इस्रायलींच्या हल्ल्यात फलस्तीनी मृतांची संख्या 44 पर्यंत पोहोचली आहे. 

Updated: Jul 10, 2014, 04:14 PM IST
इस्रायली बॉम्ब हल्ल्यात 44 ठार, 100 जखमी title=
फाईल फोटो

गाझा/ जेरुसलेम : इस्रायल सैनिकांनी गाझायेथील हमास शहरावर हल्ला केला. ज्यात अनेक महिला आणि मुलांसोबत कमीत कमी 17 फलस्तीनी नागरिकांचाही समावेश आहे. तसेच इस्रायलींच्या हल्ल्यात फलस्तीनी मृतांची संख्या 44 पर्यंत पोहोचली आहे. 

इस्रायलच्या हल्ल्यांला प्रतीउत्तर देण्यासाठी हमासच्या लोकांनी रॉकेटने हल्ले केले आणि पहिल्यांदा फलस्तिनी रॉकेटच्या हल्ल्यात जवळजवळ संपूर्ण इस्रायल आलेय.

इस्रायलने गाझा सीमाजवळील हजारो सैनिकांना एकत्र केले आहे. ज्यामुळे इस्रायल कडून होणारे हवाई हल्ल्यांसोबत जमिनी हल्ला होण्याची शक्यता वाढतेय. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर इस्रायल पंतप्रधान बेनजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, इस्रायलचे सैनिक सगळ्या शक्यतासाठी तयार आहेत. 

नेतन्याहू यांनी सांगितले, यासाठी मोहिमेचा विस्तार केला जाईल आणि आमच्या शहरावर रॉकेटचा हल्ला बंद होईल आणि शहराची शांती पुन्हा तोपर्यंत मोहीम सुरु राहिल. 

हमास व्यवस्थापित गाझामध्ये नोव्हेंबर 2012 नंतर आतापर्यंतचा सर्वांत रक्तरंजित दिवस राहीला जो इस्रायली हल्ल्यात महिला आणि मुलांसोबत 44 फलस्तिनी लोक मृत्युमुखी पडले. 

इस्रायली सेनाच्या हवाई हल्ल्यात सुमारे 300 फलस्तिनी नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायली सेनाने सागरी पट्टीजवळील 160 स्थळांवर हवाई हल्ले केले. इस्रायल सेनेच्या हवाई हल्ल्यात मुहम्मद सिनवार आणि राएद एतार यांच्यासोबत आठ हमास नेत्यांच्या घरांना लक्ष केले होते.

इस्रायली सेनाने सांगितले की, हमासच्या रॉकेट हल्ला थांबवण्यासाठी एक मोठया मोहिमेअंतर्गत इस्रायल युद्ध विमानांनी गाझा पट्टीची काही ठिकाणांना निशाना बनवला आहे. 

इस्रायल युद्धच्या विमानांनी मध्य रात्रीनंतर सापळा रचून एक वरिष्ठ इस्लामिक जिहाद सैनिक हफीज हमादच्या घराला निशाना बनवला होता. या हल्ल्यात हमाद आणि त्याचं कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला आहे. 

इस्रायलने काल सकाळपासून ऑपरेशन प्रोटेक्टिव एज या नावाने हल्ले सुरु केले आहेत. हमाद आणि त्यांच्या  कुटुंबातील लोकांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 28 झाली आहे. 

इस्रायल हल्ल्यात अजून भर पडली जेव्हा पंतप्रधान बेनजामिन नेतन्याहू बोलले की, हमासला आपल्या रॉकेट हल्ल्याची किंमत मोजावी लागणार आहे. 
 
गाझामधून 40 किलोमीटर लांब असलेले सर्व शाळा आणि किंडर गार्डन बंद केले आहेत. गाझा सीमाजवळ राहणारे ज्यु लोकांना राहण्यासाठी जागा देण्यात आली  आहे. रॉकेट हल्ल्यांने जेरुसलेम शहरात राहणाऱ्या लोकांचा गोँधळ उडाला आहे. शहरात सगळीकडे सायरनची आवाज ऐकू येत आहेत. 

फलस्तिनी प्रशासनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी मागणी केलीय की, इस्रायल सेनानी सध्यातरी हा हल्ला बंद करावा. अब्बास यांनी विश्व समुदायला आवाहन केले की, इस्रायलला आपला सैनिक हल्ला बंद करण्यासाठी दबाव टाकावा. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.