महाभियोगानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपती यांची हकालपट्टी

भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या ब्राझीलच्या राष्ट्रपती दिलमा रौस्सेफ यांच्यावर महाभियोग चालविला गेला. त्यानंतर त्याची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

PTI | Updated: Sep 1, 2016, 08:19 AM IST
महाभियोगानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपती यांची हकालपट्टी title=

ब्रासिलिया : भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या ब्राझीलच्या राष्ट्रपती दिलमा रौस्सेफ यांच्यावर महाभियोग चालविला गेला. त्यानंतर त्याची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

सरकारी बँकेमधील पैशांचा गैरवापर केल्याच्या गंभीर आरोपावरून ब्राझीलच्या राष्ट्रपती दिलमा रौस्सेफ यांच्याविरुद्ध ब्राझीलच्या सिनेटने (संसद) महाभियोग चालवून त्यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. 

चालविण्यात आलेल्या महाभियोग ठरावाच्या बाजूने ६० तर विरोधात २० मते मिळाली. दिलमा यांना गेल्या मेमध्येच पदावरून निलंबित केले होते. काल महाभियोग चालवून त्यांची उचलबांगडी केली आहे. आता त्यांच्या जागी माजी उपराष्ट्राध्यक्ष मिछेल टेमेर यांचा नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील.