भाषा शिका, नाही तर मायदेशी रवानगीचा इशारा

इंग्रजी येत नसेल तर अशा नागरिकांनी देश सोडून जावे, असा आदेश ब्रिटीश सरकारने इतर देशातील नागरिकांना दिला आहे. सरकारच्या अशा एका आदेशाने इंग्रजी येत नसलेल्या नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे.  यामुळे प्रवासी आणि अन्य व्हिसावर येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

Updated: Jan 19, 2016, 10:41 AM IST
भाषा शिका, नाही तर मायदेशी रवानगीचा इशारा title=

लंडन : इंग्रजी येत नसेल तर अशा नागरिकांनी देश सोडून जावे, असा आदेश ब्रिटीश सरकारने इतर देशातील नागरिकांना दिला आहे. सरकारच्या अशा एका आदेशाने इंग्रजी येत नसलेल्या नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे.  यामुळे प्रवासी आणि अन्य व्हिसावर येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

कॅमेरुन यांनी याबाबत संदेश देताना म्हटले आहे की, जर तुम्ही इंग्रजी शिकण्यात सुधारणा केली नाही, तर या देशात राहण्यासाठी तो एक मोठा अडथळा ठरू शकतो. 

जर दोन वर्षांत तुम्ही इंग्रजी शिकू शकत नसाल तर तुमच्यावर देशाबाहेर जाण्याची वेळ येऊ शकते, असे द टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी स्पष्ट म्हटले आहे, मात्र यानंतर इंग्रजी सुधारण्यासाठी सरकार लोकांची काळजी घेतानाही दिसत आहे. 

बाहेरून येथे आलेल्या नागरिकांसाठी विशेषत: महिलांसाठी इंग्रजी शिकण्याकरिता सरकारने २० मिलियन पौंडांची तरतूदही केली आहे. ब्रिटनमध्ये जे जोडीदारासह पाच वर्षांच्या व्हिसावर येतात, त्यांची इंग्रजीची चाचणी अडीच वर्षांनी घेण्यात येणार आहे. त्यांच्या इंग्रजीत किती सुधारणा झाली याची माहिती यावरून मिळेल.