शिकागो पोलिसांनी कृष्णवर्णीय मुलावर चालवल्या १६ गोळ्या

अमेरिकेतील शिकागो पोलिसांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्यावर्षी शिकागो पोलिसांनी लाकुयान नावाच्या १७ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला भररस्त्यावर गोळ्या घालून ठार केलं होतं. चाकू आणि ड्रग्ज बाळगल्याचा त्याच्यावर संशय होता. या प्रकरणी कोर्टाने संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Reuters | Updated: Nov 25, 2015, 11:27 PM IST
शिकागो पोलिसांनी कृष्णवर्णीय मुलावर चालवल्या १६ गोळ्या   title=

शिकागो : अमेरिकेतील शिकागो पोलिसांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्यावर्षी शिकागो पोलिसांनी लाकुयान नावाच्या १७ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला भररस्त्यावर गोळ्या घालून ठार केलं होतं. चाकू आणि ड्रग्ज बाळगल्याचा त्याच्यावर संशय होता. या प्रकरणी कोर्टाने संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रोल करा

रस्त्यावर धावणारा हा १७ वर्षांच्या कृष्णवर्णीय मुलाचा शिकागो पोलिसांच्या गोळ्यांचा शिकार ठरला आहे. शिकागो पोलिसांनी कोणताही विचार न करता या कोवळ्या मुलाला गोळ्या घालून ठार केलं आहे. एक प्रकारे हा थंड डोक्याने केलेला खून होता. शिकागो पोलिसांचा हा कारनामा पोलिसांच्या कारवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. २० ऑक्टोबर २०१४ ची ही घटना आहे.

लाकुयान मेक्डोनाल्ड हा १७ वर्षांचा तरुण हातात चाकू घेवून जात असतांना शिकागो पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितलं. मात्र, त्याने शरण येण्यास नकार दिल्यानंतर जेसन डाईक या पोलीस अधिकाऱ्याने लाकुयानवर आपलं पिस्तूल रिकामं केलं. त्याच्यावर तब्बल १६ गोळ्या चालविण्यात आल्या. या गोळीबारात लाकुयान ठार झाला. तो वर्ण व्देशाचा बळी ठरला असून या प्रकरणी पोलीस अधिकारी जेसन डाईकवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

लाकुयानच्या हातात असलेल्या चाकूची भिती वाटल्यामुळेच आपण स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्याचा खुलासा पोलीस अधिकारी जेसनने केलाय. मात्र कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमुळे जेसनचं पितळ उघड पडलं आहे. एक वर्षानंतर ही चित्रफित सार्वजनिक करण्यात आल्यानंतर शिकागोतील जनतेत तीव्र असंतोष पसरला असून जनता रस्त्यावर उतरली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.