...ही आहे चीनची सर्वात 'सुंदर महिला बॉडीगार्ड'

चीनमध्ये जी २० समिट सुरू असताना चर्चा सुरु होती ती एक महिला सिक्युरिटी ऑफिसरची... 

Updated: Sep 9, 2016, 05:23 PM IST
...ही आहे चीनची सर्वात 'सुंदर महिला बॉडीगार्ड' title=

बीजिंग : चीनमध्ये जी २० समिट सुरू असताना चर्चा सुरु होती ती एक महिला सिक्युरिटी ऑफिसरची... 

आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आयोजित करण्यात आलेल्या चर्चेदरम्यान मंचावर अनेक देशांचे बडे नेते उपस्थित होते. परंतु, अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या त्या शु शिन या महिला ऑफिसरवर... 

पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी शु शिन काम करतात. इटलीचे पंतप्रधान माटेओ रेंजी यांच्या सुरक्षेसाठी त्या तैनात होत्या. 

साऊथ चायनाच्या गुइयांग शहराच्या त्या रहिवासी आहेत. सुंदर आणि तरुण असल्यामुळे ही समिट सुरू असताना शु शिन यांचीही जोरदार चर्चा पाहायला मिळाली.

शु शिन यांना गाण्याचा आणि नाचण्याचाही छंद आहे. २०१३ मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी सोल्जर्सच्या टॉप १० सुंदर लोकांच्या सूचीमध्ये त्यांना स्थान मिळालं होतं. त्यांचा जुना फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतोय.