VIDEO : कोब्रानं चावा घेतल्यानंतर ४५ मिनिटं परफॉर्मन्स, स्टेजवरच मृत्यू

एका पॉप स्टार स्टारसोबत एक धक्कादायक घटना घडलीय... या घटनेमुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रेक्षकही हादरले. 

Updated: Apr 7, 2016, 04:07 PM IST
VIDEO : कोब्रानं चावा घेतल्यानंतर ४५ मिनिटं परफॉर्मन्स, स्टेजवरच मृत्यू title=

करवांग (पश्चिम जावा) : एका पॉप स्टार स्टारसोबत एक धक्कादायक घटना घडलीय... या घटनेमुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रेक्षकही हादरले. 

कोब्रा नागानं चावा घेतल्यानंतरही ही पॉप स्टार जवळपास ४५ मिनिटे परफॉर्मन्स सादर करत राहिली... आणि अखेर स्टेजवरच तिनं आपले प्राण सोडले.

इरमा ब्ल्यू असं या पॉप स्टारचं नाव आहे. परफॉर्मन्स सादर करत असताना ती कोब्रा नागांचाही वापर करत होती... या नागांसोबत ती डान्स करत होती. परंतु, रविवारी मात्र याच किंग कोब्रानं तिला चावा घेतला... आणि तिला आपला जीव गमवावा लागला.