मेलॅनिया ट्रम्पनं चोरले मिशेल ओबामांचे शब्द?

सध्या एका बातमीमुळे अमेरिकेत खळबळ उडालीय. रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डोनल्ड ट्रम्प यांच्या नावाची घोषणा झालीय.  

Updated: Jul 20, 2016, 04:40 PM IST
मेलॅनिया ट्रम्पनं चोरले मिशेल ओबामांचे शब्द? title=

वॉशिंग्टन : सध्या एका बातमीमुळे अमेरिकेत खळबळ उडालीय. रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डोनल्ड ट्रम्प यांच्या नावाची घोषणा झालीय. त्यानंतर झालेल्या कन्व्हेन्शनमध्ये ट्रम्प यांची बायको मेलेनियानं माझा नवरा कसा चांगला आहे आणि तो कसं अमेरिकेचं भलं करू शकतो, हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, यावेळी तिनं चक्क अमेरिकेची फर्स्ट लेडी मिशेल ओबामाचं भाषण चोरलं. त्यामुळे अमेरिकेत चर्चा सुरू झालीय या 'कॉपी टू कॉपी'ची...

अमेरिकेत प्रचाराची गडबड आहे. या प्रचारात पहिल्यापासूनच वादग्रस्त राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे दावेदार डोनल्ड ट्रम्प... आता तर ते रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार झालेत. त्यामुळे त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कन्व्हेन्शनमध्ये ट्रम्प यांची पत्नी मेलॅनिया बोलायला उभी राहिली. पांढऱ्या रंगाच्या सिल्कच्या आऊटफिटमध्ये ती कॉन्फिडन्ट वाटत होती आणि तिच्या भाषणातली शब्दफेकही उत्तम होती. कन्व्हेन्शनला उपस्थित असलेले सगळे जण लक्ष देऊन तिचं भाषण ऐकत होते... सगळं काही सुरळीत सुरू असताना नेमका घोळ झाला. मेलॅनियानं तिचं भाषण चक्क चोरलं होतं आणि तेही चक्क अमेरिकेच्या फर्स्ट लेडीच्या भाषणामधून... २००८ सालीच्या कन्व्हेन्शनमध्ये मिशेल ओबामा यांनी जे मुद्दे मांडले होते, तेच मुद्दे तशाच प्रकारे मेलॅनियानं मांडले. मेलॅनियाचं हे भाषण दूर कुठल्याशा एका कॉफी हाऊसमध्ये काही पत्रकार ऐकत होते... हे मुद्दे कुठेतरी ऐकल्याचं त्यांच्या लक्षात आलं... आणि मग सगळंच बिंग फुटलं... मेलॅनियानं मिशेलच्या भाषणाची कॉपी केली होती.

पुढच्या पिढीला काय शिकवायचं, याबद्दलही दोघींची भाषणं सारखी होती. मेलॅनियानं मिशेलचं भाषण चोरल्याचं समजताच अमेरिकेत एकच खळबळ उडाली... घाईघाईन रिपब्लिकन पक्षाला सारवासारव करण्यासाठी पत्रकार परिषदही घ्यावी लागली आणि हे सगळं खापर डोनल्ड यांच्या प्रचार कॅम्पेनवर फोडण्यात आलं. 

मेलॅनिया ही मॉडेल आहे. तिचे आणि डोनल्ड ट्रम्प यांचे आक्षेपार्ह फोटो हिलरी क्लिंटन यांनी व्हायरल केले होते आणि अशी फर्स्ट लेडी तुम्हाला चालेल का, असा प्रश्न अमेरिकेच्या जनतेला विचारला होता.... आता भाषण चोरणारी फर्स्ट लेडी तुम्हाला चालेल का, असं विचारालया नवा मुद्दा हिलरीला मिळालाय... आता ती चूक मेलॅनियाची असेल किंवा तिला भाषण लिहून देणाऱ्याची असेल... जो बूँद से गयी वो हौदसे नही आती...