भारतीय इंजिनियरच्या हत्येचा ट्रम्प यांच्याकडून निषेध

कॅन्सस येथील हल्ल्यात झालेल्या भारतीय अभियंत्याची हत्येप्रकरणावर अमेरिकेटे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Mar 1, 2017, 04:58 PM IST
भारतीय इंजिनियरच्या हत्येचा ट्रम्प यांच्याकडून निषेध title=

वॉशिंग्टन : कॅन्सस येथील हल्ल्यात झालेल्या भारतीय अभियंत्याची हत्येप्रकरणावर अमेरिकेटे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रतिक्रिया दिली आहे. 

ट्रम्प बोलले की, 'ज्यू कम्युनिटी सेंटर्सला लक्ष्य करून ज्यूंच्या दफनभूमींचे करण्यात आलेले नुकसान तसेच मागील आठवड्यातील कॅन्सस शहरातील गोळीबार यावरून असे दिसते की, आपला देश धोरणांवर एक नसेल, मात्र सर्व प्रकारचा द्वेष आणि वाईट गोष्टींविरोधात एकत्रितपणे उभा राहतो.'

कॅन्सस येथील हल्ल्यात भारतीय अभियंत्याची हत्या झाल्यानंतर ट्रम्प यांनी प्रथमच भाष्य केले. निर्घृण हत्येबाबत ट्रम्प यांनी आपल्या भाषणात जाहीर निषेध नोंदवावा अशी मागणी भारतीय-अमेरिकन संघटना आणि संसद सदस्यांकडून करण्यात येत होती. हिलेरी क्लिंटन यांनी देखील याची मागणी केली होती.