या देशात ड्रायव्हिंग इन्ट्रक्टर पेमेंट म्हणून Sex स्वीकारू शकतात

इंस्ट्रक्टर ड्रायव्हिंग शिकविण्यासाठी फी म्हणून आता सेक्सचा स्वीकार करू शकतात. 

Updated: Dec 22, 2015, 04:22 PM IST
या देशात ड्रायव्हिंग इन्ट्रक्टर पेमेंट म्हणून Sex स्वीकारू शकतात title=

अॅम्टरडॅम :  ही बातमी ऐकून तुम्हांला जरा विचित्र वाटले पण हॉलंडमध्ये सरकारने ड्रायव्हिंग इंस्ट्रक्टरला फी म्हणून एक विचित्र प्रकार शोधून काढला आहे. इंस्ट्रक्टर ड्रायव्हिंग शिकविण्यासाठी फी म्हणून आता सेक्सचा स्वीकार करू शकतात. हॉलंड सरकारने याला कायदेशीर मान्यता दिली आहे. 

मेट्रो या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार कायदेशीर मान्यता असलेल्या नियमाला 'राइड फॉर ए राइड' नावाने ओळखले जात आहे. डच सरकारने विद्यार्थ्यांसाठी 'राईड फॉर ए राइड' हा विचित्र कायदा लागू केला आहे. दरम्यान, हा कायदाचा वापर करण्याचा अधिकार १८ वर्षाच्या वरील विद्यार्थ्यांना दिला. 

ख्रिश्चियन युनियन पार्टीचे नेता गर्टजॅन सेगर्स यांनी डच संसदेत या नियमावर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, ड्रायव्हिंग शिकविण्याच्या बदल्यात सेक्सच्या नियमाला अवैधानिक राहू दिली पाहिजे. 

सरकारकडून या नियमाला हिरवा कंदील दिल्यानंतर 'राईड फॉर राइड' संदर्भात जाणून घेण्यात लोकांची रुची वाढली आहे.