जग संपणार? विचित्र ढग पाहून सर्वनाश होण्याची भीती

 कोस्टारिकाच्या आकाशात एक विचित्र ढग दिसून आल्यानंतर आता जग संपणार असल्याची भीती निर्माण झाली होती. 

Updated: Sep 21, 2015, 05:10 PM IST

 

कोस्टारिका :  कोस्टारिकाच्या आकाशात एक विचित्र ढग दिसून आल्यानंतर आता जग संपणार असल्याची भीती निर्माण झाली होती. 

इंद्रधनुष्यासारखा पण अधिक प्रकाशमान हा ढग पाहून अनेकांना भीती वाटली. वातावरणातील बदलामुळे हा विचित्र ढग निर्माण झाला पण त्यामुळे सर्व अफवांचे पेव फुटले. 

परग्रहावरून हल्ला झाला आहे, त्यामुळे हा ढग निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. कोस्टारिकाच्या आकाशात हा ढग दिसल्यावर एलीनने हल्ला केला असून ते जगाचा नाश करण्याच्या विचारात असल्याची अफवा या विज्ञान युगात पसरली. 

तसेच या महिन्यात बल्ड मून आणि सुपर मून दिसणार आहे. त्यामुळे त्यामूळ उल्का पडणार आहे, त्यात सर्व जण ठार होतील. तसेच 28 सप्टेंबर रोजी सुपरमून असल्याने जगाचा नाश होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.