फेसबुकने मुलीला वडिलांशी केलं कनेक्ट

आयुष्यात लोकांशी कनेक्ट होण्याची टॅग लाईन फेसबुकने खरी करून दाखवली आहे. एडिले ग्रीनएकर जिनेवात राहणारी एक मुलगी आहे. या मुलीने फेसबुकच्या सहाय्याने ३० वर्षानंतर आपल्या वडिलांना शोधून काढलं.

Updated: May 8, 2014, 05:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जिनेवा
आयुष्यात लोकांशी कनेक्ट होण्याची टॅग लाईन फेसबुकने खरी करून दाखवली आहे. एडिले ग्रीनएकर जिनेवात राहणारी एक मुलगी आहे. या मुलीने फेसबुकच्या सहाय्याने ३० वर्षानंतर आपल्या वडिलांना शोधून काढलं.
अवघ्या अडीच महिन्यांची असतानाच, एडिले हिला तिचे वडील डेरेक हे नॉटिंगहॅमशायरच्या आपल्या घरातून कुटुंबाला सोडून निघून गेले. या गोष्टीला ३० वर्ष उलटून गेल्यावर एडिलेने वडिलांना शोधण्यासाठी फेसबुकवर एक प्रकारची शोध मोहीम हाती घेतली. यात एडिलेने आपल्या वडिलांचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला. या फोटोला २१ हजार लोकांनी शेअर केला.
काही दिवसानंतर एडिलेशी तिच्या वडिलांनी संपर्क साधला. ते सध्या जिनेवा मध्ये राहतात. एडिलेने जिनेवामध्ये आपल्या वडिलांना भेटल्याचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला. तसेच मी फेसबुकच्या सहाय्याने ३० वर्षानंतर आपल्या वडिलांना भेटल्याचं देखील तिने सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.