...हा आहे जगातला सर्वोत्तम देश!

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमला सुरुवात झालीय. बुधवारी इथं जगातील सर्वश्रेष्ठ देशांची लिस्ट जाहीर करण्यात आलीय. 

Updated: Jan 21, 2016, 02:07 PM IST
...हा आहे जगातला सर्वोत्तम देश! title=

नवी दिल्ली : स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमला सुरुवात झालीय. बुधवारी इथं जगातील सर्वश्रेष्ठ देशांची लिस्ट जाहीर करण्यात आलीय. 

यामध्ये, पहिला क्रमांकावर आहे तो जर्मनी... या यादीत नंबर वनचा दावा करणारा अमेरिका मात्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय. ही लिस्ट यूएस न्‍यूज एन्ड वर्ल्‍ड रिपोर्ट, पेन्सलिवेनिया यूनिव्हर्सिटीचं व्‍हार्टन स्‍कूल आणि बीएवी कन्सल्टिंगनं एकत्रितपणे तयार केलीय. यासाठी ६० देशांतील १६,००० हून अधिक लोकांचा सर्व्हे करण्यात आलाय. 

व्यापाराच्या सुविधा, ताकद आणि नागरिकतेमुळे जर्मनी पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवू शकलीय. अमेरिका या यादीत चौथ्या क्रमांकावर असली तर सैनिकी क्षमता आणि जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा अजूनही कायम आहे. 

या यादीतील पहिल्या १० क्रमांकावरचे देश

१. जर्मनी

२. कॅनडा

३. लंडन

४. अमेरिका

५. स्वीडन

६. ऑस्ट्रेलिया

७. जापान

८. फ्रान्स

९. नेदरलँड

१०. डेन्मार्क