गूगलच्या स्वयंचलित कारची रस्त्यावर चाचणी

गूगलच्या नव्या स्वयंचलित कारची चाचणी सॅनफ्रॅन्सिकोच्या रस्त्यावर घेण्यात आली आहे. या कारमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला असून गूगलने यात बऱ्याच सुविधाही दिल्या आहेत.

Updated: Jun 26, 2015, 05:49 PM IST
गूगलच्या स्वयंचलित कारची रस्त्यावर चाचणी title=
सॅनफ्रॅन्सिको : गूगलच्या नव्या स्वयंचलित कारची चाचणी सॅनफ्रॅन्सिकोच्या रस्त्यावर घेण्यात आली आहे. या कारमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला असून गूगलने यात बऱ्याच सुविधाही दिल्या आहेत.
लॅक्सस RX450h ही गूगलची स्वयंचलित कार अत्याधुनिक सॉफ्टवेअरवर चालत असून या गाडीची रचना खूप वेगळी आहे. या गाडीला स्टिअरिंग व्हील आणि पेडल्स नसल्यामुळे नवीन गाडीत रिमुवेबल स्टिअरिंग व्हील देण्यात आलंय. त्यामुळे आता ही गाडी मानवचलितही दिसणार आहे.

गूगलने आतापर्यंत १२ अपघात नोंदवले असून सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले आहे. आजवरच्या अपघातात कुणालाही इजा झाली नसून हे अपघात सौम्य स्वरूपाचे होते, असे गूगलने सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.