लंडन : कधी कधी व्यक्तीचा आततायीपणा त्यालाच मान शरमेने खाली घालायला लावतो तसेच तो जीवावरही बेततो. असाच प्रकार ब्रिटनमध्ये अनिवासी भारतीयाच्या बाबतीत घडला. ३६ वर्षीय मिनेश पर्बतला चालत्या गाडीत आपल्या गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना महागात पडले. यावेळी कार अपघात झाला आणि गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला. तर मिनेशला ७ वर्षांची शिक्षा झाली आहे.
मिनेश BMW कार चालवत होता. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड लिसा वॉटलिंग होती. तिच्यासोबत तो सेक्स करीत होता. यादरम्यान, कारला अपघात झाला. यामध्ये लिसा गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. लिसा दोन मुलांची आई होती.
हा अपघात गतवर्षी मार्च महिन्यात झाला होता. ज्यावेळी कार १०० किमी प्रतीतास वेगाने धावत होती. ही घटना पहिलीच नाही. याआधी फ्रान्समध्येही घडली आहे. एका ऐतिहासिक किल्ल्यावरील भींतीवर सेक्स करणारे दाम्पत्य पडल्याने दोघांचा मृत्यू झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.