हिलेरी-ओबामा : जगातील सर्वात प्रभावी स्त्री-पुरुष

अमेरिकेमध्ये झालेल्या गॅलप सर्व्हेनुसार परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंन या जगातील सगळ्यात जास्त प्रभावी महिला ठरल्या आहेत तर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात जास्त प्रभावी पुरुष म्हणून निवडले गेलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 1, 2013, 01:52 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेमध्ये झालेल्या गॅलप सर्व्हेनुसार परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंन या जगातील सगळ्यात जास्त प्रभावी महिला ठरल्या आहेत तर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात जास्त प्रभावी पुरुष म्हणून निवडले गेलेत.
गॅलपच्या इतिहासात गेल्या ११ वर्षात अन्य कोणत्याही महिलेपेक्षा क्लिंटन या अधिक प्रभावी असल्याचं या सर्व्हेतून समोर आलंय तर ओबामा हे गल्या ५ वर्षांतील सर्वात प्रभावी पुरुष ठरलेत.
सर्वात प्रभावी महिलांच्या श्रेणीत अमेरिकेची फर्स्ट लेडी मिशेल ओबामा, टीव्ही टॉक शोची यजमान ऑप्रा विन्फ्रे आणि माजी परराष्ट्र मंत्री कोंडोलिजा राईस यांना हिलेरींच्यानंतर पसंती मिळालीय.
याचप्रमाणे ओबामा यांनी दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला, २०१२ चे राष्ट्रपती निवडणुकीतील रिपब्लिकन प्रतिस्पर्धी मिंट रोमनी, अमेरिकेतील ख्रिश्चन धर्म प्रसारक बिल्ली ग्राहम, माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यु बुश आणि पोप बेनेडिक्ट १६ यांना मागे टाकलंय.