Video : रस्त्यावर जेव्हा उडू लागल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा...

रहदारीच्या रस्त्यावर कोट्यवधी रुपयांच्या नोटा उडू लागल्या विचार करा काय होईल. हाँगकाँगमध्ये अशी घटना घडली आणि त्यावेळी ट्रॅफीक पूर्णपणे थांबले आणि लोक आपल्या चालत्या गाडीतून उतरून पैसे गोळा करू लागले. 

Updated: Dec 25, 2014, 04:29 PM IST
Video : रस्त्यावर जेव्हा उडू लागल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा... title=

हाँगकाँग : रहदारीच्या रस्त्यावर कोट्यवधी रुपयांच्या नोटा उडू लागल्या विचार करा काय होईल. हाँगकाँगमध्ये अशी घटना घडली आणि त्यावेळी ट्रॅफीक पूर्णपणे थांबले आणि लोक आपल्या चालत्या गाडीतून उतरून पैसे गोळा करू लागले. 

हाँगकाँगमध्ये एक व्हॅन सुमारे सहा कोटी ८० लाख डॉलर (५२५ मिलियन हाँगकाँग डॉलर घेऊन जात होती. अचानक व्हॅनला अपघात झाला आणि व्हॅनमधील सुमारे ४५ लाख रुपयांच्या नोटा रस्त्यावर पसरल्या. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक लोक आपल्या गाड्या थांबवून रस्त्यावर उडत असलेल्या नोटा लूट लागले. अनेकांनी आपल्या खिशांमध्ये भरभरून नोटा घेऊन गेले. 

पण जेव्हा हत्यारबंद पोलीस घटनास्थळी पोहचले त्यावेळी त्यांनी नोटा परत करण्याची अपील केली. त्यामुळे हाँगकाँग पोलिसांना अर्धे पैसे गोळा करण्यात यश मिळाले. पोलिसांनी सांगितले की, लवकरच उर्वरित पैसा परत केला नाही तर हा गंभीर गुन्हा मानला जाईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.