अजब गजब! या व्यक्तीने दोन वर्षात जन्माला घातले ५४ मुलं...

 तुम्ही खरा विक्की डोनर पाहिला आहे का?  हो हा आहे खरा विक्की डोनर... त्याने दोन वर्षात आपला स्पर्म डोनेट करून एकूण ५४ बालकांचा जैविक पिता झाला आहे. 

Updated: Dec 9, 2015, 10:10 PM IST
अजब गजब! या व्यक्तीने दोन वर्षात जन्माला घातले ५४ मुलं...  title=

लंडन :  तुम्ही खरा विक्की डोनर पाहिला आहे का?  हो हा आहे खरा विक्की डोनर... त्याने दोन वर्षात आपला स्पर्म डोनेट करून एकूण ५४ बालकांचा जैविक पिता झाला आहे. 

हा कारनामा ४३ वर्षीय डेकलेन रूनी या ब्रिटनच्या व्यक्तीने केला आहे. रूनने गेल्या वर्षी आपल्या स्पर्म डोनेशनसाठी वेबसाईट सुरू केली होती. त्याने आतापर्यंत ३१ महिलांना स्पर्म डोनेट करून त्यांना आई होण्याचा आनंद दिला आहे. 

गेल्या दोन वर्षात डेकलेन रूनी यांनी ५४ मुलांना जन्म दिला आहे. त्यात १७ मुलं आणि १४ मुली आहेत. तसेच १५ महिला अजूनही गर्भवती आहेत. त्याने स्मार्टफोन अॅप सुरू केला आहे, लोक सरळ त्याच्यी संपर्क साधू शकतात. 

डेकलेन याला स्वतःचे ८ मुलं आहेत. जे चार वेगवेगळ्या महिलांपासून आहेत. रूनी या कामासाठी कधी पैसे घेत नाही. तो २०० मैल प्रवास करून जातो ज्या महिलांना स्पर्मची गरज आहे. यासाठी केवळ तो आपल्या प्रवासाचा खर्च घेतो. 

स्पर्म डोनेशनसाठी त्याने काही अटी ठेवल्या आहेत. तो सर्व महिलांची वैद्यकीय तपासणी करतो. रूनी दावा केला की काही महिलांशी सेक्स करून त्यांना गर्भवती केले आहे. फक्त महिलांची मदत करण्यासाठी त्याच्यासोबत सेक्स केला आहे. मौजमस्तीसाठी करत नाही. या कामात त्यांची पार्टनरही त्याला साथ देते त्यांना तीन मुले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.