भारतात मंदिरात जाऊन बुडणाऱ्या फेसबूकला वाचविले - झुकरबर्ग

फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने रविवारी या गोष्टीचा खुलासा केला की फेसबूकच्या वाईट काळात त्यांनी भारतात जाऊन एका मंदिरात भेट घेतली होती. 

Updated: Sep 28, 2015, 02:20 PM IST

 

 

सॅन होजे : फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने रविवारी या गोष्टीचा खुलासा केला की फेसबूकच्या वाईट काळात त्यांनी भारतात जाऊन एका मंदिरात भेट घेतली होती. 

जुकरबर्ग म्हणाला, तो भारताला ज्ञानमंदिर मानतो, ज्या ठिकाणाहून त्यांने पुन्हा फेसबूकला उभारण्याची प्रेरणा मिळाली. त्याने सांगितले की १० वर्षांपूर्वी त्यांची कंपनी खूप वाईट काळातून जात होतो. फेसबूक विकावे लागेल की काय अशी परिस्थिती होती. पण त्यावेळी मी भारतात आलो आणि त्याने मला प्रेरणा मिळाली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फेसबूकच्या हेटक्वॉर्टरमध्ये झुकरबर्ग बोलत होता. वैयक्तीक मी भारताविषयी मी अनेक गोष्टीने उत्साहित आहे. १० वर्षापूर्वी एक महिन्यांच्या लांब दौऱ्याचा उल्लेख करताना तो म्हणाला फेसबूकच्या इतिहासात भारत महत्त्वपूर्ण आहे. 

फेसबूक कठीण काळातून जात होते. त्यावेळी गुरू आणि अॅपलचे सीईओ स्टीव जॉब्स यांनी सांगितले की, भारतातील एका मंदिराला भेट दे. त्यानंतर मी एक महिना भारतात भ्रमण केले. भारताच्या यात्रेनंतर फेसबूकला अब्जाधिश कंपनी केली. तेथूनच मला भरोसा निर्माण झाला. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.