स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर जग, तिसऱ्या महायुद्धाचे सावट

आयएसआयएस आता खतरनाक झाले आहे... त्यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे अणू बॉम्ब आहे... इसीसच्या या दाव्याला किरकोळात घेता येणार नाही. या वर्षी जूनमध्ये इसीसने इराकचे मोसूल शहर काबीज केल्यानंतर तेथील विद्यापीठातून युरेनियमची चोरी झाली होती.

Updated: Dec 2, 2014, 06:55 PM IST
 स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर जग, तिसऱ्या महायुद्धाचे सावट title=

बगदाद : आयएसआयएस आता खतरनाक झाले आहे... त्यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे अणू बॉम्ब आहे... इसीसच्या या दाव्याला किरकोळात घेता येणार नाही. या वर्षी जूनमध्ये इसीसने इराकचे मोसूल शहर काबीज केल्यानंतर तेथील विद्यापीठातून युरेनियमची चोरी झाली होती.

जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया म्हणजे ISISचा नवीन मनसुबा का आहे. इराक आणि सिरीयामध्ये दहशतवादी खेळ खेळणारी इसीस आता नवा खेळ खेळण्याच्या तयारीत तर नाही ना... 

या संदर्भात ब्रिटनच्या एका वर्तमान पत्राच्या हवाल्याने ISIS ने अणू बॉम्ब बनविला आहे. तसेच ते याचा वापरही करू शकतात. 

ब्रिटनचे वर्तमानपत्र ‘मिरर’ने दिलेल्या बातमीनुसार दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर अणूबॉम्बचे फोटो अपलोड केले आहे आणि धमकी दिली की हा बॉम्ब लंडनवर पडू शकतो... त्यामुळे ISIS च्या निशाण्यावर संपूर्ण ब्रिटन तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. ब्रिटनमधील अनेक तरूण ISISमध्ये सामील झाले आहेत. 

या वर्षी जूनमध्ये दहशतवादी संघटना ISISने इराकच्या मोसूल शहरावर कब्जा केला होता. त्यानंतर मोसूल विद्यापीठातून युरेनियम चोरीला गेले आहे. इराकच्या या विद्यापीठातून ४० किलो युरेनियमची चोरी झाली होती. यावरून अंदाज व्यक्त केला जातो की या मोसूल विद्यापीठातून चोरीला गेलेल्या रेडिओधर्मी युरेनियमचा वापर अणू बॉम्ब बनविण्यासाठी केला गेला आहे. 

युरेनियम चोरी बाबत संयुक्त राष्ट्रात इराकचे राजदूत मोहम्मद अलहकीमने संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांना ८ जुलै रोजी पत्र लिहून सूचना दिली होती. 

ही ब्रिटनसाठी धोक्याची घंटा आहे. पाश्चिमात्य जगाला धमकाविणारा दहशतवादी पैकी ब्रिटनचा स्फोट विशेषज्ञ हुमायूं तारीक २०१२ मध्ये पश्चिम आशियात पळून गेला आहे. मुस्लिम अल ब्रिटानी उप नावाने तारीने ट्विट केला की ISIS जवळ खतरनाक बॉम्ब आहे. इसीसला मोसूल विद्यापीठातून काही रेडिओअक्टीव पदार्थ मिळाले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.