'इसिस'ची क्रूरता : जॉर्डनच्या बंधक पायलटला जिवंत जाळलं

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट म्हणजेट 'इसिस'नं जॉर्डनच्या एका बंधक पायलटला जिवंत जाळलंय. 

Updated: Feb 4, 2015, 10:29 AM IST
'इसिस'ची क्रूरता : जॉर्डनच्या बंधक पायलटला जिवंत जाळलं  title=

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट म्हणजेट 'इसिस'नं जॉर्डनच्या एका बंधक पायलटला जिवंत जाळलंय. 

मोएज अल कसासबेह असं या पायलटचं नाव आहे. कसासबेह याला जिवंत जाळल्याचा व्हिडिओ इसिसनं इंटरनेटवर जाहीर केलाय. या व्हिडिओच्या सत्यतेवर जॉर्डननंही शिक्कामोर्तब केलंय.

या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांनी कसासबेहला एका लोखंडी पिंजऱ्यामध्ये बंद केलंय... आणि त्याच्या चारही बाजुनी आग लावताना ते दिसत आहेत. 

हा व्हिडिओ इसिसनं सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केलाय. SITE नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून इसिस आपल्या कृत्याचा प्रचार-प्रसार करतंय. 


मोएज अल कसासबेह

मोएज अल कसासबेह याला इस्लामिक स्टेटनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सीरियाच्या रक्काजवळ त्याचं विमान उडत असताना बंधक बनवलं होतं.   

हे विमान अमेरिकन नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सेनेच्या मदतीसाठी जात होतं. कसासबेह याला जिवंत जाळल्याच्या वृत्तावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही शोक व्यक्त केलाय. इस्लामिक स्टेटची क्रूरताचं या व्हिडिओमधून दिसत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. 

इसिसनं काही दिवसांपूर्वी जपानी पत्रकार केंजी गोटो याचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ जाहीर केला होता. इराक आणि सीरियामध्ये सक्रिय असणाऱ्या या संघटनेनं आत्तापर्यंत अनेक पत्रकार आणि विदेशी नागरिकांची मुंडकं छाटल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.