ब्राझीलच्या केटरिनाने कौमार्य विकलं ४ कोटीला

ब्राझीलच्या एका विद्यार्थिनीने बुधवारी रात्री ऑनलाईन आपल्या कौमार्याची बोली लावली. आणि ७८०,००० डॉलर (जवळजवळ चार करोड) तिने तिचं कौमार्य विकलं.

Updated: Oct 27, 2012, 04:02 PM IST

www.24taas.com, लंडन
ब्राझीलच्या एका विद्यार्थिनीने बुधवारी रात्री ऑनलाईन आपल्या कौमार्याची बोली लावली. आणि ७८०,००० डॉलर (जवळजवळ चार करोड) तिने तिचं कौमार्य विकलं. शारीरिक शिक्षणाची विद्यार्थीनी असणारी केटरिना मिगलियोरिनी ने जपानच्या नात्सू नावच्या व्यक्तिला आपलं कौमार्य विकलं.
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार या ऑनलाईन लिलावात जपानच्या नात्सू आणि भारतीय रूद्र चॅटर्जी आणि दोन अमेरिकन यांच्यात जबरदस्त स्पर्धा होती. केटरिनाने दावा केला आहे की, ती वेश्या नाहीये. ती आपलं शरीर म्हणजे कौमार्य फक्त विकत आहे.
वर्जिन्स वॉंटेंड नावाच्या एका डॉक्युमेंट्री बनविणाऱ्या एका कंपनीचे क्रू सदस्य त्यांच्यासोबत असणार आहेत. २० वर्षीय ललना केटरिनाचं कौमार्य मिळविण्यासाठी अनेक स्पर्धकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू होती. त्यात जपानच्या नात्सूने बाजी मारली.