मलेशिया बेपत्ता विमान: काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले

एका `पिंगर लोकेटर`नं विमानाच्या `ब्लॅक बॉक्स`मधून निघणाऱ्या सिग्नलशी जुळणारा एक संकेत शोधून काढलाय. ज्यातून चीनला जाताना अचानक बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध लागण्याची शक्यता निर्माण झालीय.

Updated: Apr 7, 2014, 06:53 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, पर्थ
एका `पिंगर लोकेटर`नं विमानाच्या `ब्लॅक बॉक्स`मधून निघणाऱ्या सिग्नलशी जुळणारा एक संकेत शोधून काढलाय. ज्यातून चीनला जाताना अचानक बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध लागण्याची शक्यता निर्माण झालीय.
८ मार्चला मलेशियाच्या क्वालालांपूर इथून बीजिंगकडे निघालेलं एमएच ३७० हे विमान अचानक बेपत्ता झालं होतं. त्याचाच शोध घेत असलेल्या संयुक्त एजेंसी समन्वय केंद्राचे प्रमुख एअर चीफ मार्शल (रिटायर्ड) एंगस ह्यूस्टन यांनी आज सांगितलं की, बोइंग विमान एमएच३७० चा शोध घेत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या यंत्रणेला काही सिग्नल मिळत आहेत. हे सिग्नल्स हरवलेल्या एमएच३७० विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून निघणाऱ्या सिग्नलशी साधर्म्य ठेवत आहेत.
अमेरिकेचे सैन्य तसंच ऑस्ट्रेलियाचे जहाजं समुद्राच्या विविध भागात विमानाच्या भागांचा शोध घेत आहेत. या शोध मोहिमेत एका ध्वनीचा शोध लागला होता. शोधकर्त्यांना आशा आहे की तो ध्वनी विमानाचा `डेटा रेकॉर्ड`च्या `केटर बीकन` असू शकतो. पण अजूनपर्यंत त्याबाबत निश्चित असं सांगता येत नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.