धक्कादायक ! भररस्त्यात तरुणीला विवस्त्र करुन मारहाण

एका एकट्या तरुणीला भररस्त्यात मारहाण करतांनाच एक व्हि़डिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही जण मिळून या मुलीला मारहाण करतांना दिसत आहेत. त्याआधी या तरुणीला त्यांनी भररस्त्यात विवस्त्र केलं. पण तिला मदत करण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही.

Updated: Jun 29, 2016, 07:23 PM IST

चीन : एका एकट्या तरुणीला भररस्त्यात मारहाण करतांनाच एक व्हि़डिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही जण मिळून या मुलीला मारहाण करतांना दिसत आहेत. त्याआधी या तरुणीला त्यांनी भररस्त्यात विवस्त्र केलं. पण तिला मदत करण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही.

चीनमधील बोझोऊ मधला हा व्हि़डिओ सध्या व्हायरल झालाय. मारहाण करणाऱ्या एका महिलेचा आरोप आहे की या 'तरुणीचे तिच्या पतीसोबत अनैतिक संबंध आहे.' तेथे उपस्थित एक व्यक्ती असा ही म्हणतोय की, 'तुम्ही या तरुणीला मारहाण करण्यापेक्षा तुमच्या पतीला मारलं पाहिजे कारण तो ही तितकाच दोषी आहे.'

व्हायरल व्हिडिओ