दोन पेक्षा अधिक मुलं तर करणार नसबंदी...

म्यानमारच्या रखीने प्रांतात बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लिमांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी म्यानमार सरकारने दोन मुलांनंतर मुसलमानांनी नसबंदी करावी.

Updated: May 28, 2013, 01:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, थांगून
म्यानमारच्या रखीने प्रांतात बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लिमांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी म्यानमार सरकारने दोन मुलांनंतर मुसलमानांनी नसबंदी करावी असा फतवा काढला आहे. मुले ही अल्लाची देन नाहीत. त्यामुळे तुम्ही दोनपेक्षा जास्त मुलांना जन्म देऊ शकत नाही, असा दम सरकारने भरला आहे. एवढेच नव्हे तर, मुसलमानांच्या एकापेक्षा अधिक लग्नांवरही सरकारने बंदी घातली आहे. या भूमिकेमुळे म्यानमारवर जगभरातून टीका होत असली तरी सरकारने बिलकूल पर्वा केलेली नाही.
म्यानमारमध्ये गेल्या वर्षी बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लिमांमध्ये मोठी दंगल उसळली होती. यावेळी झालेल्या हिंसाचारात बौद्ध नागरिकांनी मुसलमानांची घरे जाळून टाकली तर मुस्लिमांनी बौद्धांच्या मठांवर जोरदार हल्ले चढविले होते. या जातीय दंगलीची चौकशी करण्यासाठी म्यानमार सरकारने एका आयोगाची स्थापना केली होती.
या आयोगाने या जातीय हिंसाचाराला म्यानमारमधील अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिमांच्या लोकसंख्येला जबाबदार धरले. त्यामुळे सरकारने मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी मुसलमानांच्या नसबंदीचा निर्णय घेतला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.