'२०५० पर्यंत सर्वात जास्त लोकसंख्या मुस्लिम असेल'

शतकाच्या शेवटपर्यंत या जगात वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात जास्त जनसंख्या असेल ती मुस्लिम धर्मियांची.... असं आम्ही नाही तर एक अहवाल सांगतोय. 

Updated: Dec 31, 2015, 03:18 PM IST
'२०५० पर्यंत सर्वात जास्त लोकसंख्या मुस्लिम असेल' title=

नवी दिल्ली : वेगवेगळ्या मुस्लीम संघटनांकडून आपली लोकसंख्या वाढवण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो... आणि येणाऱ्या दिवसांत हे शक्यही होणार आहे. कारण सद्य शतकाच्या शेवटपर्यंत या जगात वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात जास्त जनसंख्या असेल ती मुस्लिम धर्मियांची.... असं आम्ही नाही तर एक अहवाल सांगतोय. 

विशिष्ट धर्माची जनसंख्या वाढण्यामागे धार्मिक कारणं खूप महत्त्वाची ठरतात. मुस्लिम लोकसंख्या वाढण्यामागेही हे एक महत्त्वाचं कारण आहे. 'प्यू रिसर्च सेंटर'नं जाहीर केलेल्या एका अहवालात २०५० पर्यंत मुस्लिम समुदायाची संख्या सर्वात जास्त असेल, असा उल्लेख करण्यात आलाय. 

ख्रिश्चन धर्मीयांनाही मुस्लिम जनसंख्येत मागे टाकतील, असं भाकीत या अहवालात वर्तवण्याता आहे. उल्लेखनीय म्हणजे, सध्या संपूर्ण जगातील एक तृतीयांश लोकसंख्या ख्रिश्चन धर्माचं अनुकरण करते. 

नेमकं काय म्हटलंय या अहवालात... 
'प्यू रिसर्च सेंटर'नं जाहीर केलेल्या एका अहवालाप्रमाणे सध्या जगात २.२ अरब लोक ख्रिश्चन धर्म मानतात. परंतु, २०५० पर्यंत त्यांची लोकसंख्या ३० टक्के होईल... त्याचप्रमाणे मुस्लिमांची १.६ अरबहून २.८ अरबवर पोहचेल. ही लोकसंख्या सर्वात जास्त असेल. त्यानंतर मुस्लिम धर्म हा जगातील सर्वात जास्त मानला जाणारा धर्म म्हणून प्रस्थापित होईल, असं या अहवालात म्हटलंय.