मोदींच्या शपथविधीला अखेर नवाझ शरीफ येणार

नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणाऱ्या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार असल्याचं नक्की झालंय.

Updated: May 23, 2014, 11:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणाऱ्या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार असल्याचं नक्की झालंय.
आता पाकिस्तानडून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. नरेंद्र मोदींनी सोमवारी होत असलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रण पाठवलं होतं.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही आमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र शरीफ यांच्याकडून याबाबत कोणतही उत्तर देण्यात येत नव्हतं.
नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीमुळे भारत पाकिस्तान मैत्रीचा एक वेगळा अध्याय लिहीला जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.