नेल्सन मंडेला यांना अखेरचा निरोप!

वर्णद्वेषविरोदी लढ्याचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष दिवंगत नेल्सन मंडेला यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अंत्यसंस्कारासाठी मंडेला यांचं पार्थीव विमानान त्यांच्या जन्मगावी आणण्यात आलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 15, 2013, 03:40 PM IST

www.24taas.com,वृत्तसंस्था, कुनु, द.आफ्रिका
वर्णद्वेषविरोदी लढ्याचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष दिवंगत नेल्सन मंडेला यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अंत्यसंस्कारासाठी मंडेला यांचं पार्थीव विमानान त्यांच्या जन्मगावी आणण्यात आलं.
दक्षिण आफ्रिकेतील मंडेला यांच्यावर कुनु या त्यांच्या जन्मगावी आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंडेला यांचं ६ डिसेंबरला निधन झालं. त्यांच्या निधनानं एका क्रांतिकारी युगाचा अस्त झाला.
मंडेला यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. दक्षिण अफ्रिकेचे गांधी अशीही त्यांची ओळख होती. वर्णभेदाविरोधात मंडेला यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यासाठी मंडेलांनी २७ वर्ष तुरुंगवास भोगला... अध्यक्षपदाच्या काळात मंडेला यांनी जगातील अनेक देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी १९९३ साली नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं...
फुफ्फुसांच्या संसर्गामुळे मंडेला गेल्या वर्षभरापासून अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार होत होते. त्यामुळं उपाचारासाठी वरचेवर त्यांना रुग्लायलात दाखल करावं लागत होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.