ओबामांच्या हत्येचा कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा

अमेरिकेत न्यायमूर्तींनी अखेर एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Updated: May 14, 2014, 08:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
अमेरिकेत न्यायमूर्तींनी अखेर एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या आरोपीने एका महिलेची हत्या केली आहे, ही हत्या म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हत्येचा भाग असल्याचं आरोपीने म्हटलं आहे.
शेवटी निर्णायक मंडळाच्या सहमतीने या जेम्स मॅक्के या ४४ वर्षांच्या व्यक्तीला मृत्युची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मॅक्के यांनी २०११ मध्ये ७५ वर्षीय मेबेले शीन यांच्यावर चाकूने वार करून हत्येची कबुली दिली होती. तेव्हा त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती, तसेच आपण शीन यांची कार चोरली कारण, या कारने वॉशिग्टनला जाऊन त्याला बराक ओबामांना मारायचं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.