कुलभूषण जाधव : पाकिस्तानी अधिकाऱ्यानं दिली कबुली

पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटलाय. कुलभूषण जाधवांचं पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी इराणमधून अपहरण करून पाकिस्तानात आणण्यात आल्याचं पाकिस्तानच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं मान्य केलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं गेल्या वर्षी ३ मार्च रोजी जाधवला पाकिस्तानच्या बलूचिस्तानमधून अटक केल्याचा दावा चुकीचा असल्याचंच सिद्ध होतंय. इराणमधून बलूचिस्तानात नेऊन तिथं अटक दाखवण्यात आली.

Updated: May 25, 2017, 11:52 AM IST
कुलभूषण जाधव : पाकिस्तानी अधिकाऱ्यानं दिली कबुली  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटलाय. कुलभूषण जाधवांचं पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी इराणमधून अपहरण करून पाकिस्तानात आणण्यात आल्याचं पाकिस्तानच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं मान्य केलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं गेल्या वर्षी ३ मार्च रोजी जाधवला पाकिस्तानच्या बलूचिस्तानमधून अटक केल्याचा दावा चुकीचा असल्याचंच सिद्ध होतंय. इराणमधून बलूचिस्तानात नेऊन तिथं अटक दाखवण्यात आली.

एका पाकिस्तानी वृत्तवाहीनीवर झालेल्या एका चर्चेच्या वेळी पाकचे माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल अमजद शोएब यांनी ही कबुली दिलीय. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतासमोर जोरदार आपटी खाल्यावर आता पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेली ही कबुली दिलीय. त्यामुळे भारतानं आधीपासूनच केलेल्या दाव्याला आता पाकिस्तानी माजी अधिकाऱ्याचीच पुष्टी मिळालीय. 

भारताच्या म्हणण्यानुसार, जाधव यांचं इराणमधून अपहरण करण्यात आलं होतं... इथं ते नौसेनेतून निवृत्त झाल्यानंतर बिझनेस करत होते.