पाकिस्तानकडून भारताला क्लीनचीट

बलुचिस्तानात हिंसा पसरवण्याचे आरोप करणा-या पाकिस्तानने आता स्वतःहून भारताला क्लीनचीट दिली आहे.

Updated: Nov 21, 2015, 06:43 PM IST
पाकिस्तानकडून भारताला क्लीनचीट title=

इस्लामाबाद : बलुचिस्तानात हिंसा पसरवण्याचे आरोप करणा-या पाकिस्तानने आता स्वतःहून भारताला क्लीनचीट दिली आहे.

या हिंसेत भारताचा हात असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी सिनेटच्या स्थायी समितीला सांगितलं.

ऑगस्टमध्ये अजीज यांनीच भारताविरोधात ठोस पुरावे असून डॉजियर सोपवणार असल्याचं दावा केला होता. मात्र आता भारताविरोधात कोणतेही पुरावे नसल्याने सरताझ यांनी या हिंसेत भारताचा हात नसल्याचे स्पष्ट केले. 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.