'२०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं'

२०२०पर्यंत पाकिस्तानकडे २००पेक्षा अधिक अण्वस्त्रं असतील इतकी क्षमता पाकिस्ताननं अण्वस्त्र कार्यक्रमांमधून धारण केली असल्याचं अमेरिकी थिंक टँकचं म्हणणं आहे. यासंबंधातील एक अहवाल तयार करण्यात आला असून धोरणात्मक स्थैर्य यासंबंधात हा अहवाल आहे. 

PTI | Updated: Nov 24, 2014, 05:12 PM IST
'२०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं' title=

वॉशिंग्टन: २०२०पर्यंत पाकिस्तानकडे २००पेक्षा अधिक अण्वस्त्रं असतील इतकी क्षमता पाकिस्ताननं अण्वस्त्र कार्यक्रमांमधून धारण केली असल्याचं अमेरिकी थिंक टँकचं म्हणणं आहे. यासंबंधातील एक अहवाल तयार करण्यात आला असून धोरणात्मक स्थैर्य यासंबंधात हा अहवाल आहे. 

पाकिस्ताननं भारताच्या भीतीपोटी चालविलेली ही तयारी लक्षात घेता उपखंडातील एकात्मतेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणं पाकिस्तानला ही अण्वस्त्रं दहशतवाद्यांच्या हाती जाऊ न देण्याचं आव्हानही आहे. हे आव्हान आणि हा धोका याबाबत अमेरिकाही चिंतेत असून त्यादृष्टीनं कौन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सनं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पाकची वाढती अण्वस्त्र क्षमता चिंतेचा विषय

दक्षिण आशिया हा भाग यादृष्टीनंच धोक्याचा असल्याचं मत अहवालात व्यक्त करण्यात आलं आहे. पाकिस्तानकडील अपेक्षित अण्वस्त्र तयार करण्याची क्षमता पाहाता ९० ते ११० अण्वस्त्रं ते सहज तयार करू शकतील आणि ते क्षमताही वाढवत आहेत. हे पाहाता साधारण २५० अण्वस्त्रांची निर्मिती ते २०२०पर्यंत करू शकतील. यामुळंच पाकिस्तानचा अण्वस्त्र विकास हा जगाच्या दृष्टीनं चिंतेचा विषय असल्याचं मतही अहवालात व्यक्त करण्यात आलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.