पाकिस्तान म्हणजे अतिरेक्यांचं नंदनवन - पेंटागॉन

अमेरिकन लष्करी मुख्यालय पेंटागॉननं पाकिस्तानला जबरदस्त दणका दिलाय. पाकिस्तान म्हणजे अतिरेक्यांचं नंदनवन असल्याचं सांगत ताकदवान भारतीय लष्कराच्या विरोधात पाकिस्तान अतिरेक्यांचा छुपेपणानं वापर करत असल्याचं पेंटागॉननं म्हटलंय.

Updated: Nov 4, 2014, 05:31 PM IST
पाकिस्तान म्हणजे अतिरेक्यांचं नंदनवन - पेंटागॉन title=

वॉशिंग्टन : अमेरिकन लष्करी मुख्यालय पेंटागॉननं पाकिस्तानला जबरदस्त दणका दिलाय. पाकिस्तान म्हणजे अतिरेक्यांचं नंदनवन असल्याचं सांगत ताकदवान भारतीय लष्कराच्या विरोधात पाकिस्तान अतिरेक्यांचा छुपेपणानं वापर करत असल्याचं पेंटागॉननं म्हटलंय.

अमेरिकन काँग्रेसला सादर केलेल्या 100 पानी अहवालात पाकिस्तानचे वाभाडे काढण्यात आलेत. भारताप्रमाणेच अफगाणिस्तानमध्येही वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पाकिस्तान अतिरेक्यांचा वापर करत असल्याचं यात म्हटलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वी हेरातमधल्या भारतीय वकिलातीवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख अहवालात आहे. मोदींच्या शवथविधीच्या तीन दिवस अगोदर हा हल्ला झाला होता. मे महिन्यात या हल्ल्यात शस्त्रांस्त्रींत चार दहशतवाद्यांनी हेरात प्रांतातील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला. 

तसंच अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदावी यासाठी भारताचे प्रयत्नही वाखाणण्यात आलेत. पेंटागॉनच्या या अहवालामुळे पाकिस्तानबाबत अमेरिकेचं धोरण यू-टर्न घेण्याची शक्यता निर्माण झालीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.