सासू-सुनेच्या भांडणात पंचायतीचं तालिबानी फर्मान

उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये दोन महिलांना घरगुती अत्याचारासोबतच पंचायतीच्या तालिबानी निर्णयाचाही सामना करावा लागलाय. 

Updated: May 19, 2015, 02:46 PM IST
सासू-सुनेच्या भांडणात पंचायतीचं तालिबानी फर्मान title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये दोन महिलांना घरगुती अत्याचारासोबतच पंचायतीच्या तालिबानी निर्णयाचाही सामना करावा लागलाय. 

सासू-सुनेच्या भांडणात पंचायतीनं दोन सुनांना सगळ्या गावासमोर पहिल्यांदा कित्येक तास झाडाला बांधून तर ठेवलंच... पण, त्यानंतर त्यांना २० - २० चाबकाचे फटकेही मारले गेले.

सालवा या गावात सासूबरोबर आणि जावेबरोबर भांडण झाल्यानंतर पंचायत बोलावण्यात आली होती. यावेळी, पंचायतीनं हा तालिबानी निर्णय दिला होता. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस गावात दाखल झाली. मात्र, एकाही गावकऱ्यानं याबद्दल 'ब्र'ही उच्चारलेला नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.