मायकल जॅक्सनची 16 वर्षांची मुलगी 'प्रेग्नंट'?

दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सन याची 16 वर्षांची मुलगी पॅरीस जॅक्सन गर्भवती असल्याचं सांगण्यात येतंय. एका इंग्रजी न्यूजपेपरनं आपल्या सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिलीय. 

Updated: Sep 11, 2014, 03:40 PM IST
मायकल जॅक्सनची 16 वर्षांची मुलगी 'प्रेग्नंट'? title=

वॉशिंग्टन : दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सन याची 16 वर्षांची मुलगी पॅरीस जॅक्सन गर्भवती असल्याचं सांगण्यात येतंय. एका इंग्रजी न्यूजपेपरनं आपल्या सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिलीय. 

पॅरीसनं तिच्या बॉयफ्रेंडसोबत एन्गेजमेंट केलीय... आणि सध्या ती गर्भवती असल्याचं सांगितलं जातंय. 'यूकेज डेली स्टार'नंही या बातमीला दुजोरा दिलाय. काही फॅन्सनं पॅरिसला आपल्या बॉयफ्रेंडसोबत एका ठिकाणी डिनर करताना पाहिलं. यावेळी, पॅरिसच्या पोटाचा आकार पाहता ती गर्भवती असल्याचं दिसत होतं, असं त्यांनी म्हटलंय. 

एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, 'पॅरीस आणि तिच्या बॉयफ्रेंडनं दोन वेळा ग्लास एकमेकांवर आपटून चियर्स केलं पण पॅरीसच्या ग्लासमध्ये वाईन नव्हती तर पाणी होतं'

पॅरीस केवळ 16 वर्षांची आहे. त्यामुळे, तिनं दारुऐवजी पाणी पिणं पसंत केलं असू शकेल, असंही म्हटलं जातंय. पण, डेली स्टारच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी जॅक्सन आणि तिचा बॉयफ्रेंड एन्गेजमेंट रिंग्स खरेदी करताना दिसले होते... त्यानंतर 'बेबी बंप' दिसल्यानं पॅरीस गर्भवती असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला. 

जून 2013 मध्ये पॅरीसनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काही नकारात्मक ट्विट करून नंतर सुसाईड नोट लिहून तिनं आपल्या मनगटावर चाकूनं कापण्याचा प्रयत्न केला होता. पण, तिला तातडीनं हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिचा जीव वाचला. या घटनेनंतर ती एकांतातच राहत होती. 

आपल्या वडिलांच्या निधनानंतर पॅरीस तणावग्रस्त असल्याचं दिसून आलं होते. ती अनेक दिवस झोपूही शकली नव्हती आणि सतत तणावाखाली होती. ती मायकल जॅक्सनची एकुलती एक मुलगी आहे आणि तिला अभिनेत्री बनण्याची इच्छा आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.